तुळजापूर,दि.२५ : 
श्री. तुळजाभवानी  देवीचे गुरुवार दि.२५ मार्च  रोजी आमदार सुमन आर.आर , आणि  रोहीत आर आर (आबा) पाटील यांनी आपल्या कुटूंबियासमवेत तुळजापूरात येवुन  दर्शन घेतले.

 महाराष्ट्र राज्य, देशावर आलेले कोरोनारुपी दैत्याचा संहार कर, राज्यावरचे सर्व संकटे दूर कर असे साकडे देवीला त्यांनी यावेळी घातले. 
याप्रसंगी  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर पदाधिका-यांनी पुष्पगुच्छ व देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. 
स्वर्गीय आर आर(आबा) पाटील यांच्या धर्मपत्नी तथा तासगाव -  कवठेमहांकाळ मतदार संघाच्या  आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील  यानी दि.२५ गुरुवार रोजी श्री  तुळजाभवानी मातेची  कुंटुबा समवेत  पुजा करुन घेतले दर्शन.

आबाचे चिरंजीव रोहीत पाटील, आबाचे धाकटे भाऊ सुरेश पाटील ,त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा रोहन पाटील ,मुलगी आदीची उपस्थिती होती.दर्शन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने,व तालुका पञकार संघाच्या वतीने आर आर (आबा) पाटील परिवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी  पञकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम' पञकार संजय खुरुद,पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे रा.काँ. चे शहराध्यक्ष अमर चोपदार रा.काँ.चे युवक  तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे रा.काँ.चे बाळासाहेब चिखलकर, गणेश नन्नवरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top