तुळजापूर,दि.२५:
तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक गुरुवार दि.२५ मार्च रोजी झाली. या चुरशीच्या निवडणुकीमधे सभापतीपदी सौ.रेणुका शिवाजी इंगोले या एक मतानी व उपसभापती शरद जमदाडे हे एक मतानी निवडून आले. कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना ८ मते मिळाली व भाजपच्या उमेदवारांना ९ मते मिळाली. या निवडीमुळे पुन्हा एकदा तुळजापूर पंचायत समितिवार भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली.
यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. तसेच सभापती, उपसभापती निवडीबद्दल राखेलचे उपसरपंच महावीर जाधव, शाहिरजी रोकडे,फिरोज शेख, शिवाजी शिंदे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी भाजपचे तालुका अध्य्क्ष संतोष बोबडे, दिपक आलूरे, प्रभाकर मुळे, पिंटू मुळे, विनोद पीटू गंगणे, माजी नगराध्यक्ष बापू कने, विजय सिंगाड़े, वसंत वडगावे, आनंद कंदले, अरविंद पाटील, फिरोज शेख, महावीर जाधव, शाहिर रोकडे, शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.