वागदरी, दि.२६, एस.के.गायकवाड
गुजनूर ता.तुळजापूर येथील वारकरी किसन जिरगे हे वयाची ९० वर्षे ओलांडून गेले तरीही ते दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या पंधरवाडी एकादशीला गुजनूर ते वागदरी तीन ते चार कि.मी.अंतर आजही सायकलवरून प्रवास करून तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे असलेल्या श्री संत भवानसिंग महाराज मंदिर तेथे येवून आपली वारी पोहंचवितात.

 गेल्या अनेक वर्षांपासून ते आषाढी, कार्तिकी एकादशीला नित्य नियमितपणे पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी न चुकता करतात तर दर पंधरवाडी एकादशीला वागदरी येथील श्री संत भवानसिंग महाराज मंदिरात येवून मनोभावे दर्शन घेऊन आपली विठ्ठलाची वारी पोहंवितात.
 
  
आज घडीला वयाची ९० , ९१ वर्षे त्यांची ओलांडून गेलेली आहेत. तरीही त्यांचे शरीर निरोगी व काटक आहे. डोळ्याना चांगली दृष्टीने  आहे. ते नित्य नियमाने ऊन, वरा,पाऊस याची तमा न बाळगता सायकलवर येतात. भवानसिंग महाराजांचे दर्शन घेऊन वागदरी येथील आपल्या जळपास समवयस्क वारकरी संप्रदायातील मित्र रामचंद्र आण्णा बिराजदार यांच्या सोबत पारमार्थिक व आध्यात्मिक गप्पा मारून गावी परत सायकलस्वारी निघते.


 वारकरी मित्राची भेट झाल्याबरोबर ,किसन जिरगे हे वयाचा,जातीपातीचा विचार न करता वारकरी मित्राच्या पायावर वाकून डोके ठेवून दर्शन घेऊन गळा भेट करतात नंतर चर्चेला सुरुवात होते. त्यांच्या या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक मानवतेचा संदेश आपल्याला मिळतो.कोरोना विषाणूच्या महामारीमुळे माणूस माणसाला भेटायला भिती निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत किसन जिरगे यांच्या वारीला कोरोना थाबवू शकत नाही. कोरोनाची महामारी चुकेल पण आपली वारी चुकणार नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या एकदशीच्या वारीला खंड पडू दिला नाही. गुरुवार दि.२५ मार्च २०२१ रोजी वारीसाठी ही सायकल स्वारी वागदरीला आलीच.या वयातही त्यांचा हा उत्साह तरुणाना लाजवेल असा आहे.
 
Top