नळदुर्ग परिसरात अवकाळी पावसाचा कहर ; दोन हेक्टर क्षेत्र उन्हाळी उडीदाची झाली उगवण, नुकसान भरपाई देण्याची मागणी 

नळदुर्ग,दि.२४ :

अवकाळी पावसाने नळदुर्ग व परिसरात दोन आठवड्यापासून धुमाकूळ घातल्याने खरीप हंगाम पुर्व मशागतीचे कामे खोळंबली आहे. तर अवेळी झालेल्या पावसामुळे दोन हेक्टर मधील काढणीस आलेल्या उन्हाळी उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे उडीदाची उगवण होवुन अंकुर फुटले असुन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत  नुकसान भरपाई देण्याची  मागणी शेतकऱ्यातुन होत आहे.

रवी भास्कर पाटील रा. येडोळा ता.तुळजापूर यांची शेत जमीन (गट.न. ८०/२) नळदुर्ग शिवारातील जकणी तांड्या जवळ आहे . त्यांनी उन्हाळी हंगाम साधण्याकरिता उडीदाच्या पाच पिशव्या  बियाणाची पेरणी दि. १५ फेब्रुवारी रोजी  केली .पिक  घेण्यापुर्वी शेतीची मशागत करुन खुरपणी वैगरे असे मिळून १ लाख रुपये खर्च  झाल्याचे  शेतकरी पाटील यांनी सांगितले.



दि.९ मे रोजी  पासुन नळदुर्ग व  परिसरात सतत पाऊस पडत आहे. पंधरा दिवसांत आतापर्यंत २०० मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
 आवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी व काढणीस आलेलं  ५ एकर क्षेत्रावरील उन्हाळी उडीद पावसामुळे  झाडावरच उगवण झाले आहे.

येडोळा सा.त. भरण्याच्या मार्गावर आहे.
 
Top