नळदुर्ग शहरात  तिरंगा रॅलीस माजी सैनिकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
नळदुर्ग,दि.२३ :
"भारत माता की जय, वीर जवानांचा विजय असो", अशा जयघोषात   गुरुवार दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता नळदुर्ग शहरात  ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीला माजी सैनिकांसह नागरिकांनी  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 

रॅलीची सुरुवात शहरातील ऐतिहासिक किल्ला गेट येथुन करण्यात आली. रॅलीमध्ये माजी सैनिक अंबाजी जाधव, सुरेश सुरवसे, दामोदर सोंमवसे,भारत जाधव, शिवाजी माने, प्रकाश रगबले, सिद्राम मुळे, विलास वाघमारे, सुनिल होले,पंडीत वाघमारे, विश्वनाथ हात्ते, शिवशरण हात्ते, शेषेराव राठोड, परमेश्वर सुरवसे,प्रकाश मोरडे, नरसु दस,वीर पत्नी लक्ष्मीबाई गायकवाड व परिसरातील अनेक गातील माजी सैनिकासह भाजपचे अँड दिपक आलुरे, विलास राठोड, सौ.रंजना राठोड, सुशांत भुमकर, आशिष सोनटक्के, बस्वराज धरणे, उदय जगदाळे, श्रमिक पोतदार, ज्ञानेश्वर घोडके,नय्यर जहागिरदार, साहेबराव घुगे, सिध्देश्वर कोरे, धिमाजी घुगे,निरंजन राठोड, विनायक अहंकारी,  किशोर नळदुर्गकर, सुधीर हजारे,  श्रीमती छमाबाई राठोड, कल्पना गायकवाड, अक्षय भोई, नाना काझी, गौस शेख, एस. के. बागवान, बाबासाहेब बनसोडे,  अजय देशपांडे आदीसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली किल्ला गेट ते मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, हुतात्मा चौक , बसस्थानक संविधान चौकापर्यंत काढण्यात आली. यावेळी कार्यकत्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतले होते.यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी माजी सैनिकांना गैरविण्यात आले.
 नळदुर्ग शहरातील नागरिकांनी या रॅलीला दिलेल्या प्रतिसादामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले.
 
Top