महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने पत्रकार अयुब शेख सन्मानीत

नळदूर्ग,दि.२७:

पुणे येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनेआयोजित  प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळ्यात धाराशिव डिजिटल पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अयुब शेख यांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.

 प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा  मान्यवरांच्या हस्ते  25 मे रोजी पार पडला. अयुब शेख यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्कते रण्यात आले तर अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे होते.प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना जयकुमार गोरे,आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश  लंडगे , भिमराव तापकिर, आमदार सुनील शेळके, आमदार सुनील कांबळे, आमदार शंकर जगताप,आणि विधानसभा परिषद आमदार डॉ उषा खापरे, संपादक इकबाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमात प्रास्ताविक   डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले.
 
Top