हन्नुर दि. १९ : नागराज गाढवे
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव ग्रामपंचायत सरपंच उमाकांत गाडवे यांची अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्या चिटणीसपदी निवड करण्यात आली आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. गाडवे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार सचिन कल्याण यांचे कट्टर समर्थक आहेत.
निवडीबद्दल गाडवे यांचा विकास सोसायटी अध्यक्ष सिद्रामप्पा खेड आणि बसवणप्पा पावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी बोलताना सरपंच गाडवे यांनी तालुक्यातील युवकांना संघटित करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
याप्रसंगी माजी सरपंच संजय माने नागनाथ खेलप्पा औरसंगे श्रीशैल स्वामी उपसरपंच संगीता औरसंगे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पिंटु शिवशेटी मल्लिनाथ लक्ष्मण पाटील तेजकुमार माने इब्राहिम जमादार नागनाथ शेणकुडे सोमनाथ खांडेकर तिप्पणा आलुरे गजानंद चिकलंडे श्रीशैल शिवशेटटी अरविंद बणजगोळे प्रा एस आर जडगे विरभद्र स्वामी महेश उस्तुरगे काशिनाथ शिंदे अक्षय माने ललिता जडगे दुल्हेसाब हवालदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिकचंद धनशेटटी यांनी केले .तर सोमनाथ गाडवे यांनी आभार मानले.