लोहारा,दि.२० :
समर्थ बूथ ,सशक्त शक्ति केंद्र या माध्यमातुन लोहरा तालुक्यातील 25 शक्ती केन्द्रावर 25 सभा घेण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा लोहारा प्रभारी अँड अनिल काळे यानी आयोजित बैठकीत जाहिर केले.
लोहरा तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक झाली. या बैठकीमधे बोलताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य व् लोहरा तालुका प्रभारी अनिल काळे म्हणाले की प्रदेश अध्य्क्ष चंद्रकांत पाटिल, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार सुजीतसिंह ठाकुर ,आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाद्यक्ष नितिन काळे आदीच्या मार्गदर्शनाखाली लोहरा तालुक्यमाधे महाविकास अघाड़ी सरकारच्या विरोधात 25 शक्ती केंद्रावर 25 सभा स्थानिक नेते घेणार असुन शेतकरी पिक विमा, कायदा व सुव्यवस्था , महिलांची सुरक्षा , बेरोजगारी इत्यादी प्रश्नावर आघाडी सरकार अयशस्वी ठरले असल्याचे सांगुन चारित्र्यहीन मंत्री , पोलिस आधिका-यावर निरपाराधाच्या हत्त्येचा आरोप असलेल्याना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आशा अनेक कारस्थानामुळे सरकार बदनाम झाल्याचे काळे यांनी आरोप केला आहे.
तुघलकी निर्णय घेणाऱ्या सरकारच्या विरुद्ध जनतेमधे जावुन कार्यकर्त्यांनी आवाज उठवला पाहिजे, म्हणून लोहरा तालुक्यातील भाजपा पदाधिका-यानी दि. 20 मार्च ते 25 मार्च या सप्ताहमधे 25 शक्ती केंद्रावर 25 सभा घेण्याचे अवाहन ॲड अनिल काळे यांनी केले आहे.
यावेळी लोहरा तालुका नूतन कार्यकारिणी पदाधिका-यांचा सत्कार काळे यांच्या हास्ते करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटिल, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटिल, नूतन सरचिटणीस इक़बाल मुल्ला, युवा मोर्चाचे राहुल साठे, नूतन कार्यकर्ते उपस्थित होते.