मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर येथील परीसरात स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाने 314 व्यक्ती बसू शकतील अशा सुसज्ज सभागृहाचे बांधकाम करण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या बांधकामाची सुरुवात मार्च 2014 च्या पहिल्या आठवड्यात सुरु करुन ते चार वर्षाच्या आत पूर्ण करणे संचालक, वनामती नागपूर यांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी शासनास सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.