संग्रहित छायाचित्र
उस्मानाबाद : येथील 'लेडीज क्लब' च्‍यावतीने यावर्षीही 'नवरात्र दांडिया महोत्सव २0१३' चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून सुरु होणार्‍या या महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी नवरात्र दांडिया महोत्सवाचे लेडीज क्लब येथे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता 'तुझं माझं जमेना' फेम मनवा नाईक यांच्या उपस्थितीत दांडिया रास रंगणार आहे. गुरुवारी याच वेळेत दुनियादारी फेम उर्मिला कानेटकर यांची उपस्थिती राहणार आहे. तर ११ ऑक्टोबर रोजी 'वाट माझी बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक दांडिया रासमध्ये महिलांसोबत सहभागी होणार आहेत. शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ३५ कलाकारांनी सादर केलेला 'मराठी पाऊल पडते पुढे' हा कलाविष्कार अनुभवण्याचा लाभ घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top