![]() |
प्रतिकात्मक फोटो |
सौ. मेघा उर्फ शुभांगी सदाशिव साखरे वय 20 वर्ष रा.नितळी ता. उस्मानाबाद असे मयत विवाहितेचे नाव आहे. सदाशिव पंढरी साखरे , पंढरी सदाशिव साखरे , केसरबाई पंढरी साखरे , उशा गौतम साखरे , मैनाबाई गोरोबा जगताप सर्व रा. नितळी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. यातील मयत मेघा हिस तिचे सासरचे सदाशिव साखरे , पंढरी साखरे , केसरबाई साखरे, उषा साखरे ,मैनाबाई जगताप ,आदि लोकांनी संगणमत करूण सौ. मेघा उर्फ शुभांगी साखरे हिस लग्नातील हुंड़यातील राहिलेले एक लाख रूपये माहेरहुन घेऊन ये म्हणून तसेच तुझया पोटातील गर्भ खाली कर तुला आम्ही मुल होवू देणार नाही दिराची मुले तुझीच आहेत, असे समज या करणावररून सतत शिवीगाळ व मारहाण , शारिरीक व मानसीक छळ करून जाचहाट करून क्रुर वागणूक दिल्याने, या छळास कंटाळून सौ. मेघा उर्फ सदाशिव साखरे दि. 27-सप्टेंबर रोजी रात्री ओढणीने राहत्या घरातील माळवदाच्या हालकडीस गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस वरील लोक जबाबदार असल्याची फिर्याद उमाबाई माणिकराव सुर्यवंशी रा. मासुर्डी ता. औसा यांनी बेंबळी पोलिसात दिल्याने भांदवीचे कलम 304 (ब) 498 प्रमाने गुन्हायाची नोंद करण्यात आली असुन तपास फौजदार एम. बी जाधव हे करित आहे.
---------------