कळंब -: 'बहिणीला फोन का करतोस' असे सांगून एका युवकास सहा जणांनी अर्वाच्‍या भाषेत शिवीगाळ करुन दुचाकीवर बसवून नेऊन वेळूच्‍या काठीने सपासप मारुन व लाथाबुक्‍क्‍याने जबर मारहाण करुन जीवे मारण्‍याची धमकी दिल्‍याच्‍या तक्रारीवरुन कळंब पोलिसात सहा जणांविरूदध गुन्‍हा करण्‍यात आला आहे. याप्रकरणी दुस-या गटाने तक्रार दिल्‍यावरुन तिघांविरूध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यात आले असून दोन्‍ही गटाचे मिळून नऊजणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात झाल्‍याने सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
    सुरज लालासाहेब औताडे (वय 19 वर्षे, धंदा - शिक्षण, रा. निलकंठ ता. लातूर, हल्‍ली मुक्‍काम राजर्षी शाहू इन्स्टियुट ऑफ टेक्‍नॉलॉजी हॉस्‍टेल कळंब) असे मारहाण झालेल्‍या युवकाचे नाव आहे. तर विनोद रोटे, सागर तापडिया, रणजित खोसे, अमर ठाकूर, तात्‍या माने, ज्ञानेश्‍वर देवकर, रणजित दिनकर खोसे, सुरज औताडे, गोपाळ घुले (सर्व रा. कळंब) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींचे नावे आहेत. यापैकी पाच जणांना अटक करण्‍यास पोलिसांना यश मिळाले आहे. अन्‍य तिघे आरोपी फरार असल्‍याचे समजते. सुरज औताडे याच्‍या फिर्यादीनुसार कळंब (जि. उस्‍मानाबाद) येथील वरील सहा आरोपीनी दि. 30 सप्‍टेंबर रोजी दुपारी चार वाजण्‍याच्‍या सुमारास राजर्षी शाहू इन्स्टियुट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्‍या शेजारी असलेल्‍या नवीन शिक्षक कॉलनीत आले. त्‍या ठिकाणी या आरोपीनी सुरज यास 'तु आमच्‍या बहिणीला फोन का करतोस', असे म्‍हणून शिवीगाळ करत मोटारसायकलवर बसून सुमो चौक शिक्षक कॉलनीच्‍या मागील मोकळया जागेत नेऊन वेळूच्‍या काठीने व लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करुन मारण्‍याची धमकी दिली. तर याच घटनेत विनोद नवनाथ रोटे (वय 23, रा. कळंब) यांनी पोलिसात दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, फिर्यादीच्‍या बहिणीस सुरज औताडे, गोपाळ घुले, रणजित खोसे या आरोपीने दि. 24 व 29 सप्‍टेंबर रोजी मोबाईलवरुन वारंवार फोन करुन अश्लिल संभाषण केले. यावरुन पोलिसात तक्रार दिल्‍यावरुन वरील या तिघांविरूध्‍दही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे हे करीत आहेत.
 
Top