करमाळा : शहर व तालुक्‍यांत रोडरोमिओंनी उच्‍छाद मांडला असताना पीडित युवती ही पोलिसांच्‍या सहकार्याने पुढे येत सिंघम स्‍टाईल धुलाई करीत असल्‍याने रोडरोमिओंची धाबे दणादणले आहे. गेल्‍या दोन-तीन महिन्‍यांपासून करमाळा बसस्‍थानक, महात्‍मा गांधी विद्यालय, टाऊन हॉल परिसर, कन्‍या प्रशाला, यशवंतराव चव्‍हाण महाविद्यालय आदी ठिकाणी रोडरोमिओंनी डेरा घातला होता.
    मोटारसायकलवर रेसिंग करुन युवतींना कट मारणे, टोमणे मारणे, छेडछाड करणे, गाणी म्‍हणणे, विचकट, अश्‍लील शेरेबाजी करणे, असा सर्रास प्रकार होऊ लागला होता. मात्र ब-याच युवती याकडे दुर्लक्ष करीत होत्‍या. मात्र करमाळा पोलीस स्‍टेशनने या विरोधात मोहीम उघडली. ग्रामीण भागातील मुलींचे धाडस वाढावे यासाठी शाळा-कॉलेजमधून युवती-विद्यार्थिनीशी संवाद साधला. पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्‍मण बोराटे यांनी व्‍यूहरचना आखली. पोलीस उपनिरीक्षक भुवनेश्‍वर घनदाट, हवालदार अविनाश पाटील, बिभीषण जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी रो‍डरोमिओंविरोधात जोरदार मोहीम उघडली. नूतन पोलीस उपनिरीक्षक भारती वाठोरे, पंढरीनाथ बोधनपोड यांनी कॉलेज युवतींशी सक्षम संवाद साधला. बसस्‍थानक, शाळा-कॉलेज याठिकाणी संचलन केले. त्‍यामुळे विद्यार्थिनींची धाडसी मानसिकता होऊ लागल्‍याचे चित्र आहे. यातूनच छेडछाड करणा-या रोडरोमिओंच्‍या विरोधात पोलिसांत करणा-या रोडरोमिओंच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल होऊ लागल्‍या. एवढेच नव्हे तर काही युवतींनी अशा रोडरोमिओंची पोलिसांसमक्ष फिल्‍मी स्‍टाईल धुलाई केल्‍याने रोडरोमिओंमधून घबराट निर्माण झाली आहे.
 
Top