बार्शी -: येथील दिनकर रुद्राके यांच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजाच्या वधू-वर परिचय मेळावा होत आहे. बुधवार दि. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाचे लिंगायत बोर्डिंग सभागृह येथे हा ङ्केळावा होत असल्याचे आयोजक दिनकर रुद्राके यांनी सांगीतले.
    वीरशैव समाजाच्या सर्व पोटजातींकरिता सर्वांसाठी एप्रिलमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या मेळाव्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर दुसर्‍या मेळाव्यात विधवा विधुर घटस्‍फोटीतांसाठी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळून याच मेळाव्यात दोन वधू आणि दोन वरांच्या पसंती होऊन दोन जोडपी विवाहबद्ध झाले. आगामी तिसरा मेळावा वीरशैव लिंगायत तसेच जंगम समाजाच्या सर्व पोटजातीकरिता होत आहे.
    नाममात्र नोंदणी शुल्कामध्ये वेबसाईटकरिता वधू वरांची संगणकीय नोंदणी तसेच शाखेच्या २५ जिल्ह्यातील कार्यालयात नोंद करण्याची सुविधा वधू वर सूचक केंद्रामध्ये करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी दिनकर रुद्राके ९८५०४३१८२६, ९९७५९४३४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top