उस्मानाबाद -: प्रत्येक कारखान्याच्या भोगवटादाराने महाराष्ट्र कारखाने नियमावली 1963 च्या नियम 8 अन्वये सन 2014 या वर्षाकरिता परवाना नुतनीकरण करण्यासाठी नमुना क्रं.2 मध्ये भोगवटादार व व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरीने व आवश्यक ते शुल्क चलनाद्वारे भरुन आपले अर्ज तीन प्रतीत दि.31 ऑक्टोबर,2013 पुर्वी सादर करण्याचे आवाहन सहसंचालक, औद्यागिक सुरक्षा व आरोग्य, मराठवाडा विभाग, 27, सिंधी कॉलनी, जालना रोड,औरंगाबाद ( दुरध्वनी क्रं.0240-2331326) यांनी केले आहे.
औरंगाबाद, जालना, बीड येथील कारखान्याचे भोगवटदारांनी वरील पत्यावर अर्ज करावेत तर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद येथील कारखान्यांचे भोगवटादारांनी उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य 19, यशोदीप, एच.आय. व्ही. जी. कॉलनी, आय.टी. आय.जवळ,नांदेड ( दुरध्वनी क्रं. 02462-252156 ) यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) दि.31ऑक्टोबर 2013 पुर्वी सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अपूर्ण अर्जाचे नुतनीकरण नाकारले जाऊ शकते. परवाना नुतनीकरण अर्ज एकाच वेळी 5 वर्षाकरिता एकाच अर्जात करता येऊ शकते. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जावर नियमानुसार 5 टक्के दरमहा व कमाल 25 टक्के इतके शुल्क आकारले जाईल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वरील नमूद केलेल्या दुरध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.