बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी सिव्हील इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विलास नकाते, कल्याण देशपांडे, सचिव अमर काळे, खजिनदार प्रशांत देशपांडे, भारत बारसकर, मुख्तार शेख, प्रभाकर कुलकर्णी, गिरीष टेपाळे, दिपक गरड, महेश नांदेडकर, प्रशांत हिरे आदि अभियंते उपस्थित होते.
यावेळी अभियंत्यांनी बोलतांना महात्मा गांधींच्या विचाराची जगाला गरज असल्याचे सांगत शांतता हा विकासाचा एकमेव उपाय असून प्रत्येक भारतीयाने महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे, धर्मनिरपेक्षता हा भारतीय व्यवस्थेचा पाया असून महात्मा गांधींच्या विचारानेच भारताला शांततेतून स्वातंत्र्य मिळाले आहे.