बार्शी : बार्शी बस स्थानकातील सुलभ शौचालयाशेजारी २१ ते २५ वर्षे वयोगटाच्या अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला आहे. शनिवारी दुपारी १ च्या दरम्यान अंगात हिरवा चौकडा शर्ट, गडद निळ्या रंगाचा बनियन, अंगात चॉकलेटी रंगाची पॅन्ट, तोंडावर घेतलेल्या रुमालावर निळ्या, हिरव्या रंगाची फुलांची नक्षी असलेला तोंडातून उलटी झाल्यासारख्या अवस्थेत पडलेले प्रेत आढळून आल्याने पोलिसांनी पंचनामा करुन प्रेत ताब्यात घेतले. सदरच्या तरुणाबाबत कोणास माहिती असल्यास बार्शी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन बार्शी पोलिसांनी केले आहे.