नळदुर्ग -: बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले असंख्य खड्डे बुजवून 'आपलं घर' प्रकल्पातील विद्यार्थ्यानी अशीही गांधीगिरी केल्यामुळे शहर व परिसरात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. तर विद्यार्थ्यांच्या गांधीगिरीतून आता तरी संबंधित खाते जागे होईल का? अशी प्रवाशी व वाहनचालकांतून चर्चा होत आहे.
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा मार्ग नळदुर्ग शहरातून गेलेला असून नळदुर्ग ते जळकोट (ता. तुळजापूर) या मार्गावरील रस्ता खड्डामध्ये हरवलेला आहे. रस्त्यातील बहुसंख्य खड्डयामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागते. तर मोठमोठ्या खड्डयामुळे खड्डे चुकवताना अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत असून अनेक वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे. प्रवाशी वाहनातील प्रवाशांना खड्डयामुळे नाहकच अनपेक्षितपणे मुक्का मारचा प्रसाद मिळत असल्याची प्रवाशातून तक्रार आहे. खड्डयामुळे धावणा-या वाहनांची गती मंदावली असून तातडीची (आरोग्य) सेवा देणा-या वाहनांना खड्डयामुळे आडकाठी होत आहे. याप्रकरणी वाहनचालक, प्रवाशांतून मोठ्याप्रमाणावर तक्रारी असून याबाबतचे वृत्त अनेकदा प्रसिध्द होऊनही संबंधित खात्याने पयार्याने प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर नळदुर्ग व परिसरातून आपलं घर येथील शाळेसाठी दररोज ये-जा करणा-या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने आगळ्यावेगळ्या त-हेने आपली तक्रार मांडली आहे.
राष्ट्रसेवा दल संचलित आपलं घर प्रकल्प व नळदुर्ग परिसरातील समविचारी संस्था, संघटनेच्यावतीने महात्मा गांधींजी यांच्या जयंतीदिनी नळदुर्ग ते आपलं घर (आलियाबाद शिवार) या रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्डे विद्यार्थ्यांनी हातामध्ये टोपले घेऊन खड्यामध्ये मुरुम टाकले. खड्डे बुजविण्यासाठी चाळीस विद्यार्थ्यांसह सर्व कार्यकर्ते, गृहमाता व परिसरातील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारींनी परीश्रम घेतले. मोठ्याप्रमाणावर खड्डे बुजविण्यासाठी ट्रक्टर प्रसंगी गाढवावर मुरमाड मातीची वाहतुक करण्यात आली. याप्रसंगावरुन तरी महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जागे होतील काय? असा वाहनचालकांतून संतप्त सवाल केला जात आहे. सदरील उपक्रम आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. शरद गायकवाड, नगरसेवक संजय बताले, रचनात्मक संघर्ष समितीचे मुकेश सोनकांबळे, आपलं घर चे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, श्रीराम पोतदार अण्णा सनदी, जावेद नदाफ, प्रा. रामदास ढोकळे, बळीराम जेठे, आर.एस. गायकवाड, राष्ट्रसेवा दलाचे राज्य मंडळ पदाधिकारी विजया बिवलकर, निजगुण स्वामी, पार्वती बिराजदार, सुमन सुर्यवंशी, शांता माने, संतोष बुरंगे, नागशेट्टी लगदे, रघु नागणे, मुख्याध्यापक सुरेश कांबळे आदीजण उपस्थित होते.