कळंब : उस्मानाबाद जिल्ह्यातील गावामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकासाची कामे होत आहेत. यामध्ये क्लस्टर नं. 13 मध्ये कळंब तालुक्यातील सातेफळ व गौर येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 व दि. 16 ऑक्टोबर रोजी जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. तर हिवरे बाजार, यशोगाथा, माथा ते पायथा, पाणलोट विकास इत्यादी फिल्मद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी नितीन कांबळे व चांगदेव वाघमारे यांनी सातेफळ येथे तर चंद्रकांत माळी यांनी गौर येथे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. शेवटी आण्णा सातपुते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.