बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : तुळजापूर येथे पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे पोलिस प्रशासनची जबाबदारी वाढली आहे. लोकांच्या गर्दिवर नियंत्रण आणणे, कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे, लोकांच्या धामिक भावनांचाही आदर करणे इत्यादी गोष्टीची काळजी घेण्याची एक प्रकारची परिक्षाच या निमित्ताने देण्याची वेळ प्रशासनावर येत आहे.
    अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या (कोजागिरी) दिवशी वर्षभरातून एकवेळेस पायी वारी करुन तुळजापूरला चालत जाणार्‍या लोकांमध्ये यावर्षी लक्षणीय वाढ झाल्याचे दिसूत येत आहे. मागील अनेक वर्षांपासून काही जण पायी तुळजापूरला चालत जात आहेत.  तुळजापूरला सोलापूर, उस्‍मानाबाद जिल्ह्याबरोबरच शेजारील राज्यांतूनही यात्रेकरु चालत येत असल्याचे दिसून येते.
    बार्शीहून तुळजापूरला सुमारे 51 किलोमीटरचा प्रवास आहे. सदरच्‍या रस्‍त्‍यावर मागील पंधरा ते वीस वर्षापूर्वी यात्रेकरुंसाठी कसल्‍याही प्रकारची सुविधा नव्‍हती, प्रत्‍येक वर्षी सामाजिक कार्यकर्ते, मंडळे, संस्‍थांनी सुरु केलेल्‍या मदतीच्‍या ओघाने लोकांच्‍या सोयी सुविधा वाढल्‍या आहेत. दिवसेंदिवस लोकांच्‍या भावनाही अनेक पटींनी वाढल्‍याने होणा-या गर्दीवरुन दिसून येते. वीस वर्षापूर्वी बार्शीहून सुमारे एक हजार यात्रेकरु पायी व वाहनांवर जात होती. परंतु त्‍यात लक्षणीय वाढ होत पन्‍नास हजारांपर्यंत संख्‍या जात आहे.
    दिवसेंदिवस वाढत जाणा-या गर्दीवर अंकुश ठेवण्‍यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनानेही पाऊले उचलली असून मागील तीन चार वर्षांपासून अथवा चारचाकीवरुन तुळजापूरला जाणा-या खासगी वाहनांना पोलिसांकडून परवाना घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे मद्य प्राषण करुन वाहने चालविणा-यांवर, एकाच वाहनावर चार ते पाच जणांचा प्रवास, वाहना लाईट नसणे, वेगाने वाहन चालविणे, वाहन चालविण्‍याचा परवाना नसणे यांवर अंकुश आला आहे.
 
Top