सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना 2014-15 च्या विकास क्षेत्रातील योजना / प्रकल्प यासाठीची जिल्हा नियोजन समितीच्या छोट्या गटाची बैठक गटाच्या अध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
     यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार छोट्या गटांसाठी नियोजन समितीच्या सदस्या सर्वश्री श्रीमती सीमा पाटील, श्रीमती सुनिता रोटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे आदिंची प्रमुख  उपस्थिती होती.
     या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या 252.49 कोटीच्या विविध विभागाकडील प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली. तसेच विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्राच्या प्रारुप आराखड्याची बैठकीत छाननी करण्यात आली. यावेळी शहरी भागांना लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा नियोजनचा निधी मिळावा याबाबत चर्चा झाली.
     याप्रसंगी सन 2013-14 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यानुसार विविध विभागांकडील अखर्चित रक्कमांचा सविस्तर आढावा घेवून निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
Top