बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या कार्यरत कायम कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांना सहावा वेतन आयोनानुसार तिसरा व चौथा हप्त्याची फरक रक्कम मिळावी, याकरिता बुर्‍हाण शेख यांनी नगरपरिषदेसमोर दि. १४ पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
      यावेळी उपोषणकर्त्याला पाठींबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या निवृत्त कर्मचार्‍याने म्हटले, नगरपरिषदेच्या जमा रकमा, खर्चाच्या रकमा, शासकिय आलेला निधी त्याचा वापर कुठे केला, याचा कसलाही हिशोब नसून ठेकेदाराला जगविण्यासाठी आमच्या निवृत्ती वेतनाची रक्कम वापरली की निवडणुकीला खर्च केले हे समजत नाही, आयुष्यभर याच नगरपरिषदेच्या कामासाठी इमाने इतबारे काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर अशी आमरण उपोषणाची वेळ येणे हे देखिल लाजीरवाणी गोष्ट असल्याचे यावेळी म्हटले.
     उपोषणकर्ते बुर्‍हाण यांनी बोलतांना म्‍हणाले, शासन निर्णयानुसार सन २००९ मध्ये बार्शी नगरपरिषदेस अनुदानापोटी २,९१,३०,०००/- रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु सदरची रक्कम कर्मचार्‍यांना न मिळाल्यामुळे त्याचे काय झाले व न देण्याचे कारण काय याचे उत्तर कर्मचार्‍यांना अद्यापही मिळाले नाही. निवृत्ती वेतन धारकांचे वयोमानानुसार औषधोपचार, प्रापंचिक अडचणी व इतर गोष्टींच्या खर्चासाठी येणे असलेल्या रकमेची निकड असून वारंवार अर्ज करुनही त्यांची कसलीही दखल घेतली जात नाही. मुख्याधिकारी सदरच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने उपोषण सुरु केल्याचे बुर्‍हाण शेख यांनी म्हटले.
 
Top