पांगरी (गणेश गोडसे) : ग्रामीण भागात पोलिसांचा दुवा म्हणुन काम करत असलेल्या व सध्या तालुक्यात रिक्त असलेल्या गांवामधील पोलिस पाटलांच्या हंगामी जागा भरण्‍यासाठी प्रांत अधिका-यामार्फत प्रयत्न करू असे प्रतिपादन बार्शीचे उपविभागीय अधिकारी रोहिदास पवार यांनी केले. ते पांगरी (ता. बार्शी) येथील पोलिस ठाण्यात वार्षिक तपासणीनिमित्त आयोजित जनता पोलिस दरबारात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शरद मेमाणे, पोलिस उपनिरीक्षक राठोड यांच्यासह विविध गांवांमधील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच व पोलिस पाटील उपस्थित होते.
    पुढे बोलताना रोहिदास पवार म्हणाले की, पोलिस पाटलांना सध्या काम करताना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, त्याची मला पुर्ण जाणी आहे. त्यांच्यावर पडत असलेला ताण कमी करण्‍यासाठी आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. तसेच तंटामुक्त झालेल्या गांवातील कारभा-यांची जबाबदारी संपलेली नसुन त्यांनी कर्तव्यात कोणतीही कसर न ठेवता आपल्या कामकाजाचा गाडा असाच पुढे चालु ठेवावा असेही ते म्हणाले.
     सहाय्यक पोलीस निरीक्षक मेमाणे यांनीही यावेळी पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील 60 गांवामधील नागरिक शांतता अबाधित ठेवण्‍यासाठी देत असलेल्या सहकार्याबदल आभार मानुन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देत शांततेसाठी सहकार्य करण्‍याचे आवाहन केले. तसेच धार्मिक सन उत्सव शांततेत पार पाडण्‍यासाठी सतर्क रहावे असे सांगत अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे म्हणाले.
    यावेळी अनेक गावच्या नागरिकांनी गावातील अनेक वर्षांपासुन रिक्त असलेल्या पोलिस पाटलांच्या जागा भरण्‍याची मागणी केली.
 
Top