लंडन – एकेकाळी ती एखाद्या परीसारखी सुंदर,नाजूक दिसत आसे. मात्र,बॉडी बिल्डिंगची आवड निर्माण झाल्यावर तिने स्टेरॉईडसचे (शक्तिवर्धक औषधे) सेवन सुरु केले. या स्टेरॉईडमुळे तिच्यामध्ये विपरीत परिणाम झाले. तिचे स्त्रीत्व नष्ट होऊन तिचे पुरुषात रुपांतर झाले.
ब्रिटनमधील 28 वर्षांच्या कँडिस आर्मस्ट्रॉंग हिची ही कर्मकहानी. तिच्यावर आता जॉडी मार्श यांनी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. व्यायाम आणि स्टेरॉईडसच्या सेवनाने कँडिसचे स्नायू आर्नोल्डसारखे आहेत. मात्र त्याबरोबरच तिच्या चेह-यावर दाढी - मिशाही येऊ लागल्या आहेत. तिचे वक्षस्थ्ळ पुरुषांसारखे झाले असुन छातीवर केसही आले आहेत. या डाक्यूमेंटरीत तिने सांगितले, मला सर्व सामान्य महिलेप्रमाणेच सुंदर दिसण्याची इच्छा होती; पण झाले भलतेच ! सुंदर व चांगल्या शरीरयष्टीसाठी मी व्यायाम करणे व ड्रग्ज घेणे सुरु केले. मात्र, ज्यावेळी त्याचे कोणते साईड इफेक्टस होत आहेत हे लक्षात आले. त्यावेळी उशीर झाला होता.