![]() |
मनीष हजारे |
नळदुर्ग -: अनेकजण संघटना स्थापन करुन डिजीटल फलक व अन्य उपक्रमाद्वारे प्रसिध्दीसाठी चढाओढ करताना दिसून येते. मात्र नळदुर्ग येथे महाराणा प्रताप युवामंच स्थापना करुन जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षात अभिनव उपक्रम राबविण्याचे सुरुवातही केले आहे. या युवामंचच्यावतीने नवरात्रोत्सवात जन्मलेल्या एका तान्हुलीच्या नावे बँकेत काही रक्कम फिक्स ठेवण्याचा निर्धार करुन महाराणा प्रताप युवामंचचे नूतन अध्यक्ष मनीषसिंह हजारे यांनी ख-या अर्थाने स्त्री जन्माचे स्वागत केले आहे. या त्यांच्या कार्याचा इतरांनीही अनुकरण करणे असेच गौरवास्पद आहे.
नळदुर्ग येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रणजितसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रताप युवामंचची स्थापना करण्यात आली. यावेळी राजपूत समाज संघटनेचे माजी उपाध्यक्ष सुनील हजारे माजी नगरसेवक सुधीर हजारे, जयसिंग बिसेनी आदींच्या प्रमुख उपस्थितीत महाराणा प्रताप युवा मंचच्या नूतन कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली. अध्यक्षपदी महाराणा प्रताप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव मनीषसिंह हजारे तर उपाध्यक्षपदी इंद्रजितसिंह (मिठ्ठू) ठाकूर, बालसिंग चौहान, सचिव दिलीपसिंह ठाकूर, सहसचिव अनिकेत बिसेनी, जगदिश गहेरवार, सदस्य म्हणून राहुल हजारे, सागर हजारे, अमोल हजारे, अतुल हजारे, दिपक चव्हाण, बालाजी ठाकूर, अरुण ठाकूर, रवि ठाकूर, अनिल दिक्षित, राजेश चंदेले, संदिप हजारे, विशाल चंदेले, पृथ्वीराजसिंह चौहान, सुजितसिंह हजारे, दिनेश हजारे, बालाजी खुशालसिंह ठाकूर, विश्वजीत ठाकूर, प्रताप हजारे, शुभम हजारे, निखील ठाकूर आदी.
निवड झालेल्या नूतन पदाधिकारीची निवड दोन वर्षासाठी असून महाराणा प्रताप युवा मंचच्यावतीने समाज बांधवाच्या अडीअडचणी सोडवून विकासात्मक बाबींसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधन करण्यात येणार असून नळदुर्ग येथील प्रतापसिंह जगूसिंह हजारे यांना शारदीय नवरात्रोत्सवात कन्यारत्न झाली असून त्या मुलीच्या नावे बँकेत काही रक्कम ठेवण्याचा संकल्प केल्याचे बोलताना मनीषसिंह हजारे यांनी सांगितले.