सोलापूर -: आई राजा उदो. उदो.. चा जयघोष करीत मोठय़ा भक्तिभावाने शनिवारी शहरातील भवानी पेठेतील शक्तिदेवी श्री रुपाभवानी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विविध रुपांमधील देवीची महिमा सांगणार्‍या भक्तिगीतांमुळे शहर आणि परिसर भक्तीमय बनला होता. घरोघरी महिलांनी विधिवत पूजा करून घटस्थापना केली. शहर आणि परिसरात सुमारे ४२३ सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळांनी शक्तिदेवींची प्रतिष्ठापना केली आहे.
    सोलापूरचे आराध्यदैवत श्री रुपाभवानी मंदिरात पुजारी अंबादास पवार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी बंडू पवार, सचिन पवार, राजू पवार, संजय पवार आदी उपस्थित होते. पूजेनंतर आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रुपाभवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी ट्रस्टीचे पुजारी सुनील मसरे यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी तम्मा मसरे, अनिल मसरे, बाळासाहेब मुस्तारे उपस्थित होते.
 
Top