कळंब : ग्रामीण रुग्णालयात नवरात्रोत्सवामध्ये जन्मलेल्या पहिल्या दहा मुलींना श्री फोटो स्टूडीओचे संचालक यांच्‍यावतीने फिक्स डिपॉझिटची पावती देण्यात येणार आहे. कळंब येथील श्री फोटो स्टूडीओ, श्री सेल्स अ‍ँड सव्हीर्सेसच्यावतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
     कळंब येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये या नवरात्रोत्सवामध्ये जन्म घेणा-या पहिल्या दहा मुलींच्या नावे पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची माहिती सुर्यकांत नारकर, रवि नारकर, सौ. सुहासिनी नारकर, सौ. राधिका नारकर यांनी दिली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे मुलगी बचाव या चळवळीला चालना मिळणार आहे.
 
Top