उस्मानाबाद : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांवर वर्षनिहाय प्राप्त अनुदान व झालेल्या खर्चाचा नुकताच आढावा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात आयोजित कार्यकारी सभेच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस.एल.हरिदास यांनी घेतला.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना श्री.हरिदास ते म्हणाले की, रमाई आवास योजना सन 2013 मधील ऑगस्ट अखेर तालुकानिहाय आढाव्यात घरकुलाची कामे तात्काळ चर्चा करुन मार्गी लावा, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास व राजीव गांधी आवास योजनेत बॅकांचा सहभाग पहाता सर्व बॅकर्सनी सहकार्याची भूमिका घेऊन लाभार्थीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत व मंजूर प्रकरणे बँकेकडे प्रलंबित नाहीत, असे प्रमाणपत्र यंत्रणेस द्यावे, असे त्यांनी संबंधितांना निर्देश यावेळी दिले.
तसेच पाणलोट विकास कार्यक्रम अवर्षण प्रवण क्षेत्र (हरियाल) या कामाबाबत एक्झीट प्रोटोकॉलची चर्चा करुन कार्यवाही करणे, अखर्चीत निधीचे यंत्रणेमार्फत तात्काळ नियोजन करणे, इंदिरा आवास योजनेतंर्गत तेरखेडा ता.वाशी येथील पारधी समाजातील 77 कुटूंब जागेअभावी प्रतिक्षा यादीत असून त्यांना जागा नसल्याने प्रलंबित आहे, तो मार्गी लावण्यासाठी विशेष अहवाल तयार करुन शासनास सादर करण्याची सूचनाही यावेळी श्री.हरिदास यांनी दिली तसेच सन 2013-14 च्या कृती आराखडयासही मान्यता या बैठकीत देण्यात आली. याप्रसंगी योजनानिहाय आर्थिक व भौतिक कामांचा आढावाही त्यांनी घेतला.
यावेळी प्रकल्प संचालक केशव सांगळे, विविध विभागाचे प्रमुख तसेच बँकेचे अधिकारी यांची उपस्थिती होती.