उस्मानाबाद - सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात भारत सरकारची शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतीम तारीख 31 ऑक्टोबर,2013 आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती सन 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून ई-स्कॉलपरशिप योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही बाब विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावी व त्यांच्या काही अडचणी असल्यास मदत करावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्यास विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्कापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी प्राचार्य व मुख्यध्यापकावर राहील.
ऑनलाईन शिष्यवृत्तीबाबत व अधिक माहितीसाठी E.Scholarship /Maha. E. Scholarship या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा आसन क्रमांक आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष ही माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचणी असल्यास सहायक आयुक्त, समाजकल्याण, उस्मानाबाद या कार्यालयाशी संपर्क साधावा.