बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: श्री शिवाजी महाविद्दयालय येथे ज्यनियर रेड क्रॉस / युथ रेड क्रॉस शाखेचे चे उद्घाटन तहसीलदार तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बार्शी चे अध्यक्ष बालाजी सोमवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्या निमीत्त श्री शिवाजी महाविद्यालय व इंडियन रेड क्रॉस सोसायटी,शाखा बार्शी यांच्या संयुक्त विद्यामाने संत तुकारमा हॉल मध्ये विद्याथीनिसाठी मोफत रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीर दि.०७ ऑक्‍टोबर ते 9 ऑक्‍टोबर या दरम्यान संत तुकारम सभागृहात ३ दिवस राहणार चालू राहील. पहिल्या दिवशी सुमारे ५०० विद्याथी व विद्यार्थीने रक्त गट व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. रेड क्रॉस संस्थेने ज्युनियर रेड क्रॉस स्थापन करुन आंतराष्ट्रीय संस्थेत सामााजिक काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा लाभ विद्यार्थीनी घ्यावा. असे आवहान या वेळी तहसीलदार सोमवंशी यांनी केले. या वेळी व्यासपिठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव ,रेड क्रॉस चे मानद सचिव डॉ.काका सामनगावकर, रेड क्रॉस चे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ ,तसेच सहचिव सुभाष जवळेकर, संचालक ए.बी.कुलकर्णी ,प्रा.व्ही.तिरुपती,प्रतापराव जगदाळे,अशोक डहाळे, संतोष सुर्यवंशी इ.मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे हे होते.
 
Top