उस्मानाबाद :- हवामानावर आधारीत पथदर्शक पिक विमा योजना जिल्ह्यासाठी रब्बी करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत रब्बी हंगाम 2013-14 मधील रब्बी ज्वारी व हरभरा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्यासाठी शेतक-यांना दि. 31 ऑक्टोबर,2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या योजनेतून अवेळी पाऊस, तापमान (कमी/ जास्त) व आर्द्रता या घटकापासून समाविष्ट पिकांना होणा-या नुकसानीसाठी संरक्षण मिळणार आहे. शेतक-यांनी विमा हप्ता म्हणून भरावयाची रक्कम रब्बी ज्वारी व हरभरा या पिकासाठी  रक्कम बँकेत भरुन पिक संरक्षित करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या  योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग, लातूर यांनी केले आहे.     
 
Top