कळंब (बालाजी जाधव)  : डिकसळ (ता. कळंब) येथील श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.
    यावेळी या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संत पीठाचार्य गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, युवा नेते अक्षय मुंदडा, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर, हनुमंतराव आवाड, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमती गजराबाई बोधले यांचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
     पत्रकार उन्मेष पाटील यांना विशेष पत्रकारीता सेवा पुरस्कार त्याचबरोबर सुभाषराव काकडे, अनंतराव जगताप, चंद्रकांत साबळे यांना सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर अन्नदान सेवा पुरस्काराने बंडोपंत दशरथ, प्रभाकर  शिंदे यांना तर भजनसेवा पुरस्काराने ह.भ.प.भगवान इंगळे, अनंतराव वाघ, गोवर्धन पाटील, अशोक ठोंबरे, नारायण भिसे यांचा सन्मान केला.
    सन्मान सेवा पुरस्काराने मधुकर काळे, बलभिम धाकतोडे, सुनिताताई आडसुळ, सुशीलाताई देशमुख, सिंधूबाई देशमुख, श्रीमती छायाताई बोंदर, अंकुश मुंडे, सुदाम पाटील यांना गौरविण्यात आले.
    यावेळी श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या समाधीवर फुले उधळून पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वेदपाठक सर यांनी केले तर आभार संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प.परमेश्वर महाराज बोधले यांनी मानले.
 
Top