उस्मानाबाद -: लातुर विभागीय मंडळ. लातुर इयत्ता बारावी  च्या फेब्रु/मार्च-2014 या परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलॉईन भरण्यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य/ मुख्याध्यापक, त्यांचा निर्देशित प्रतिनिधी, संगणक जाणकार, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसाठी श्रीपतराव भोसले ज्यूनिअर कॉलेज, उसमानाबाद या  केंद्रावर प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. संबंधित   कनिष्ठ   महाविद्यालयांना याबाबत पत्र पाठविण्यात आली आहेत. ज्यांना पत्र प्राप्त झाले नाहीत  त्यांनी  मंडळाशी संपर्क साधून केंद्राचे ठिकाण व दिनांक निश्चित करुन घ्यावे व  एका संगणक जाणकार  प्रतिनिधीस  प्रशिक्षण  केंद्रावर अधिकृत पत्रासह  पाठवावे, असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी एका पत्रकान्वये केले आहे. 
 
Top