उस्मानाबाद -: सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी पोलीस हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त उस्मानाबाद पोलीस मुख्यालयामधील हुतात्मा स्मृती स्तंभ येथे शहीद झालेल्या पोलीस कर्मचा-यांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
दि. २१ ऑक्टोबर १९५९ साली हॉट स्प्रिंग्ज या भारतीय सिमेवरील बर्फाच्छदीत निर्जन ठिकाणी गस्त घालणा-या भारतीय जवानावर चिनी सैनिकांनी अमानुष हल्ला केला. तेव्हा दहा भारतीय जवान शहीद झाले होते. तेंव्हापासून त्या वीर शहीद शिपायांची अर्पण म्हणून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुत्तामा स्मृती दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. दि. १ सप्टेंबर २०११ ते दि. ३१ ऑगस्ट २०१२ या कालावधीत संपूर्ण भारतात आपले कर्तव्य बजावित असताना एकूण ६६४ पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले होते, त्यांच्या स्मृतीला पुष्पचर्क अर्पण करण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालय आवारात असलेल्या हुतात्मा स्तंभ येथे रविवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता संपन्न झाला. पोलीस हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा सैनिक अधिकारी सासने आदीजण उपस्थित होते. या प्रमुख मान्यवराच्या शुभहस्ते पोलीस हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात 576 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या नावांचे वाचन उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जी.बी. खारगे, व्ही.व्ही. शहाणे, परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एन. आवटे यांनी केले. यावेळी २१ पोलीस कर्मचा-यांच्या पथकाने बंदुकीच्या तीन गोळ्या फायर करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सशस्त्र सलामी पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक जगन्नाथ भोसले यांनी केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक एम.डी. गुंडीले, एस.आर. घाडगे, बी.एस. गावंडे यांच्यासह शहरातील पत्रकार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास दानवे यांनी केले.