बार्शी -: जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात उत्तम कामगिरी केल्यानंतर नवीन मराठी शाळेची विद्यार्थी समृध्दी वायकुळे हिची पुणे येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रायफल शुटींग या क्रीडा प्रकारांकडे नव्या पिढीनेही आकर्षित होण्याची गरज असण्याच्या काळातच दहा वर्षाच्या समृध्दी वायकुळे हिने या खेळाचा सराव सुरु केला. जिल्हास्तरावर यश मिळविल्यानंतर आता पुणे विभागीय शालेय रायफल शुटींग स्पर्धेतही बार्शीकडून स्पर्धेत उतरलेली समृध्दी समीर वायकुळे ही एकमेव खेळाडू आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. समृध्दीला उमेश नायकुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीनंतर बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनंत कवठाळे यांनी समृध्दीचा सत्कार केला. यावेळी महादेव माने, तुकाराम आगावणे, ज्ञानेश्वर खुने, जगन्नाथ लोहार, बालाजी सौदागर, सारीका नकाते, ज्योती मांजरे, भाग्यश्री बावकर आदी उपस्थित होते.