बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कृषिभूषण गणेशकाका कुलकर्णी यांच्या विचाराचा वारसा समाजात रुजविणे गरजेचे असल्याचे मत जिल्हापरिषदेचे सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
    रविवार दि. २० रोजी माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे गणेशकाका कुलकर्णी यांच्या द्वितीय पुण्यस्‍मरणानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी प्रा. शिवाजीराव सावंत, पोलिस अधिक्षक तुषार दोशी, पत्रकार राजा माने, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, संदिप साठे, बापूसाहेब जगताप, अरविंद पवार, धनंजय डिकोळे, शुभांगी श्रीरामे, गोविंदराव कुलकर्णी, जयंत पाटील, रमेश तावडे, शहाजी साठे, मुन्ना साठे, संजय पाटील घाटनेकर, एस.आर.कुलकर्णी, प्रशांत धर्मराज, सुधीर लंकेश्वर, सिंधूताई शिंगाडे, औदुंबर कोल्हे, संजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलतांना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, तळागाळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून गणेशकाकांनी प्रयत्न केले. आपल्यासोबत पूर्वीपासून सख्य असल्याने त्यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास ङ्कोहिते पाटील परिवार सदैव खंबीरपणे पाठीशी उभा राहील.
    शिवाजीराव सावंत म्हणाले, गोरगरिबांना मदत करणारा, गरजूंना रोजगार उपलब्ध करुऩ देणारा, शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता प्रदान करण्याचा ध्यास असणारा स्वभाव असल्यामुळे गणेशकाका फार कमी कालावधीत जनसमुदायाचे गळ्यातील ताईत बनले. गणेशकाकांच्या पश्‍चातही त्यांचे विचार लोकांच्या कल्याणासाठी उरले आहेत. प्रतिष्ठानच्या माध्‍यमातून विविध समाजोपयोगी कामे यापुढेही अशीच सुरु ठेवावी. शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी बोलतांना गणेशकाका हे सर्वसामान्यांचे आधारवड होते, काकांच्या अकाली जाण्याने शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. समाजासाठी चळवळ करणारी माणसे प्रस्थापितांना चालत नसल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली. गणेशकाकांची चळवळ मात्र सुरुच ठेवावी यासाठी प्रतिष्ठानने कार्य करणे गरजेचे आहे.
    यावेळी १५१ जणांनी रक्तदान केले, १०५१ जणांची नेत्रचिकीत्सा करण्यात आली, यातील २०० जणांवर एच.व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे येथे मोफत नेत्र शस्तक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या आदर्श व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सामान्य विज्ञान परीक्षेतील यशाबद्दल तुषार कदम, शुभदा जगदाळे, अभिजीत शेंडगे, धनंजय साठे, पंकज आरगडे, निखिल सावंत यांना रोख रक्कम, सन्‍मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रंजना राऊत (आदर्श माता), सोजरबाई शेलार (आदर्श पालक), कु. किर्ती कदम (आदर्श विद्यार्थी), अब्दुलरहिम पठाण (आदर्श शिक्षक), डॉ. विनोद शहा (आदर्श समाजसेवक), शाहीर धुळाप्पा देवकुळे (आदर्श कलावंत), हदिदास पारेकर (आदर्श उद्योजक), शुभांगी गवळी (आदर्श शिक्षक), किरण जाधव (आदर्श शिक्षक), सलीम चाऊस (आदर्श पोलिस निरीक्षक) यांचा सत्कार करण्यात आला. राज्यसेवा परीक्षेतील यशाबद्दल रमेश घोलप, प्रदिप उबाळे, बिभिषण गव्हाणे, पांडूरंग कन्हेरे, शिवाजी शिंदे, निलेश कदम, अतुल कदम, पवनकुमार चव्हाण यांना गौरविण्यात आले. गायींच्या प्रदर्शनातील उत्कृष्ट गायीसाठी दिलीप काळे, संकरित कालवडीसाठी विलास कन्हेरे, भारत माळी, अनिल कदम, जर्सी गायींसाठी कल्याण खेडकर, खिलार गायीसाठी अंकुश गायकवाड, सुजीत सुर्वे यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
 
Top