उमरगा (लक्ष्मण पवार) : रागाच्या भरात सख्या पुतण्याने चुलत्यावर कु-हाडीने सपासप वार करुन निघृण खुन करुन त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बेटजवळगा (ता. उमरगा) येथे सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, दिलीप मारुती जमादार (वय 48 वर्षे, रा. बेटजवळगा, ता. उमरगा) असे खून झालेल्या इसमाचे नाव असनू जीवन शिवाजी जमादार (वय 32 वर्षे, रा. बेटजवळगा, ता. उमरगा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील जीवन जमादार हा बलसूर येथील एका खासगी शाळेत लिपीक आहे. या आरोपीने सोमवारी सकाळी त्याचा सख्खा चुलता दिलीप जमादार हा शेतात म्हशीचे दुध काढत असताना अचानकपणे तेथे जाऊन कु-हाडीने दिलीप याच्या डोक्यावर, हातावर, मानावर सपासप वार केल्याने दिलीप जमादार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत मयताच्या अंगावर चार वार झाले. त्यानंतर जीवन यानेही स्वतः शेतातील झाडास गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, आरोपी जीवन याने त्याची चुलती चांगुना दिलीप जमादार यास दि. 18 ऑक्टोबर रोजी शेतात खुरपत असताना त्यास मारहाण केली होती. तेंव्हा चांगुना जमादार यांनी पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी जीवनविरूद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. पुन्हा दि. 19 तारखेला आरोपीने मारहाण केल्याने चांगुनाने पोलीसाना घडला प्रकार सांगितला. याप्रकरणी जीवन विरूद्ध गुन्हा दाखल करुन आरोपी जीवन याचा शोध घेतला असता पोलिसांच्या हाती तो लागला नाही. जीवन याने रविवार दि. 20 रोजी रात्री घरी आला व त्याचे वडील शिवाजी जमादार आणि त्याची आई यांना तो म्हणाला, आपणाला चुलत्याच्या विरोधातील भांडण मिटवायचे आहे, तर यावेळी त्याचे वडील सोमवारी भांडण मिटवू असे सांगून सकाळी सर्वजण उठून गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी निघाले, तेंव्हा आरोपी जीवन घरात आंघोळ करीत होता. सर्वांनी चल, असे म्हणताच पाठीमागून येतो म्हणून सांगितला व गेला नाही. उलट जीवनने चुलत्याचा खुन करुन स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. याबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.