उस्मानाबाद -: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथून या रॅलीस सुरुवात झाली. ही रॅली शासकीय रुग्णालय, मारवाड गल्ली, सावरकर चौक, पोस्ट आफीस, पोलीस ठाणेसमोरुन आंबेडकर चौक, शिवाजी चौक बस स्थानकमार्गे श्री तुळजाभवानी स्टेडियमला विसर्जित करण्यात आली. रॅलीमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक नईम हाश्मी, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व एफ.सी. राठोड, सहायक पोलीस हवालदार सी.एन. देशमुख, हेडकॅान्स्टेबल डी.एस.भगत, पोलीस नाईक सुधीर डोरले, पोलीस कॅान्स्टेबल नितीन तुपे, नितीन सुरवसे व बालाजी  तोडकर यांनी सहभाग  घेतला.  तसेच जनजागृती सप्ताहानिमित्त बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय व बार्शी नाका चौकात पथनाट्य संचाने वेगवेगळे पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.  
 
Top