इटकळ :- कोजागिरी पौणिर्मेनिमित्‍त श्री तुळजाभवानी मातेच्‍या दर्शनासाठी राज्‍यासह परप्रांतातून नळदुर्ग, इटकळ मार्गे   श्री क्षेत्र तुळजापुरला पायी जाणा-या भाविक भक्तांना नळदुर्ग व इटकळ (ता. तुळजापूर) येथे विविध सेवाभावी मंडळांच्‍यावतीने मोफत अन्नदान करण्यात येत आहे.
    इटकळ (ता. तुळजापूर) येथे लहुजी सेना, जय मातादि नवरात्र मंडळ, सुनिल चव्हाण युवामंच, धायफुले स्पिनिंग मिल यांच्यावतीने तीन दिवसापासुन अन्नदान सुरू आहे. कनाटर्काहुन अक्कलकोट मार्गे बहुसंख्य भाविक पायी इटकळ येथुन श्री क्षेत्र तुळजापूर कडे जातात. त्याना सेवा घडावी म्हणुन दरवर्षी हा उपक्रम सुरू असतो.
    नळदुर्ग येथे भोईराज मंडळ, नारायण बोडीगेवार यासह अनेक दानशूर संस्‍था, संघटना, मंडळांच्‍यावतीने अन्‍नदान, फराळाचे वाटप करण्‍यात येत आहे. याचा भाविक मोठ्याप्रमाणावर लाभ घेत आहेत.                  
   फोटो ओळी : इटकळ (ता.तुळजापूर) येथे भक्तांना मोफत अन्नदान वाटप करताना पो.का. गोविंद पवार, सोमनाथ कांबळे, शंकर वाघमारे, आसपाक मुजावर, अब्दुल शेख, फिरोज मुजावर, नागेश क्षिरसागर आदि.
 
Top