बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील कृषिभूषण कै.गणेश कुलकर्णी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातध्ये संकरित गायींचे प्रदर्शन, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गुणवंत विद्यार्थी तसेच आदर्श व्यक्तींचा सत्कार यासह अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी उपळाई (खु.) येथे याची सुरुवात होत आहे. यावेळी दुधाळ संकरित गायींचे प्रदर्शन होत असून उत्कृष्ट गायीसाठी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी ८ पासून दुपारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहणार आहे.
एच.व्ही.देसाई नेत्ररुग्णालय यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, चष्मे व औषध वाटप, रक्तदान शिबीर, सौर उर्जेवर चालणारे विहिरीवरील व बोअरमधील पंप यांचे प्रात्यक्षिक तसेच मार्गदर्शन शिबीर होणार आहे. माढा परिसरातील १५ शाळांमध्ये १८०० विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, शेतकरी, उद्योजक, बचतगट, समाजसेवक, कलावंत यांना प्रोत्साहनासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे एस.आर.कुलकर्णी, जयंत राऊत, उत्रेश्वर चव्हाण, संजय चव्हाण, विशाल कदम, प्रशांत कोल्हे, अजित अनभुले, समाधान कदम, औदुंबर कोल्हे व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.