नळदुर्ग : तब्बल एक महिन्यापासून सुरु करण्यात आलेले बोरी धरणाचे कॅनॉल तात्काळ बंद करुन सद्या होत असलेली पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी स्थानिक मनसेच्या वतीने शाखा अभियंता कुरुबुर सिंचन प्रकल्प (पाटबंधारे कार्यालय) नळदुर्ग यांच्याकडे केली आहे.
    नळदुर्ग येथील बोरी धरण सद्या पुर्ण भरले असून पाटबंधारे विभागाने या धरणाचे कॅनॉल सुरु केले आहे. शहापूरच्या साठवण तलावात पाणी सोडण्याच्या नावाखाली गेल्या एक महिन्यापासून बोरी धरणातील पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आलेले आहे. कॅनॉलला अनेक ठिकाणी गळती असल्याने सद्या कॅनॉलचे पाणी भरपूर प्रमाणात वाया जात आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या वर्षी तिव्र पाणीटंचाई जाणवली होती. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी धरणातील पाण्याचे जतन करणे गरजेचे आहे. परंतु एक महिन्यापासून कॅनॉल सुरु आहे व लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरी या बाबतीत शेतक-यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी तसेच भविष्यात नळदुर्ग, तुळजापूर, नळदुर्ग या गावांना पाणीटंचाई जाणवू नये यासाठी पाटबंधारे विभागाने तात्काळ बोरी धरणाचे कॅनॉल बंद करावे अन्यथा मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष ज्योतीबा येडगे, एस.टी.कामगार सेवा उपजिल्हाप्रमुख बशीर शेख, शहर उपाध्यक्ष अरुण जाधव, अलिम शेख, शिवाजी चव्हाण, रमेश घोडके, गौस कुरेशी, दत्तात्रय धारवाडकर, वसीम कुरेशी, अस्लम शेख यांच्या सह्या आहेत.
 
Top