प्रतिकात्‍मक
वाशी : सातबारा अभिलेखा मध्ये नावची नोंद करुन घेण्यासाठी दिड हजार रुपयाची लाच घेताना विजोरा (ता. वाशी) येथील महीला तलाठीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडुन अटक केल्‍याची घटना गुरुवार दि. 24 ऑक्‍टोबर रोजी घडली.
    अनुराधा शिवाजी देशमुख (तलाठी, विजोरा, ता. वाशी) असे लाच घेताना अटक केलेल्‍या महिला तलाठीचे नाव आहे. विजोरा (ता. वाशी) येथे तुकाराम मुळीक व त्यांचे दोन भावांची शेलगाव येथील गट नं. ५३(ब) मधील वडीलोपार्जीत शेतजमीन वाटुन घेण्यासाठी न्यायालयामार्फत फेरफार मंजुरही करुन घेतला होता. या फेरफारची सातबारामध्ये नोंद करुन घेण्यासाठी ते इजोरा सज्ज्याच्या तलाठी अनुराधा देशमुख यांच्याकडे आले. त्यावेळी अनुराधा देशमुख यांनी मुळीक यांना ४ हजार ५०० रुपयाची मागणी केली. व मुळीक यांच्याकडुन तिन हजार रुपये घेतले व तलाठी देशमुख यांनी उर्वरीत दिड हजार हजार रुपये अनुदान द्या तुमचे काम लगेचच करते असे सांगितले.
    यांनतर तुकाराम मुळीक यांनी दि. २3 ऑक्‍टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली व या प्रकाराबाबत सविस्तर तक्रार नोंदवली. तक्रार दाखल झाल्यानंतर गुरुवार रोजी वाशी येथील न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या देशमुख यांच्या निवासस्थानी ठरल्याप्रमाणे सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी अनुराधा देशमुख यांनी तक्रारादार तुकाराम मुळीक यांच्याकडुन १५०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
    सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक हाश्मी, त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले, पोनि सिद, सपोफौ चंद्रकांत देशमुख, पोना सुधीर डोलारे, पोकॉ तुपे, मपोकॉ स्नेहा गुरव यांनी केली.
 
Top