बार्शी : अल्पवयीन मुलीला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून विविध गावांमध्ये वेळोवेळी लैंगिक छळ केल्याची तक्रार पिडीत मुलीने बार्शी पोलिसांत दिली आहे.
    सिमेंट वीटाच्या कारखान्यात मुनीमाचे काम करणार्‍या सुरज उर्फ सुरेश गुरुराज शेटे (रा. बार्शी) असे यातील आरोपीचे नांव आहे. चांगल्या पगाराची नोकरी देतो असा विश्वास दाखवून, पगाराचे पैसे आणावयाचे आहेत, असे सांगून त्या पिडीत मुलीला स्कुटी वाहनावर बसवून सिमेंट वीट कारखान्याकडे नेले. यानंतर सोलापूर, पुणे, संभाजीनगर, तुळजापूर, आदी गावांत घेऊन गेला. अनेक बसस्थानकावर मुक्काम करत गावोगावी फिरुन पुन्हा पिंपरीचिंचवड भागातील एका सिमेंटचे साहित्य तयार करण्याचा कारखान्यावर त्या मुलीला घेऊन गेला. कामगारांसाठी बनविण्यात आलेल्या छोट्या रुममध्ये काही दिवस त्या मुलीला ठेऊन अश्‍लिल चाळे करुन विनयभंग केला. दररोजच्या सदरच्या घटनांना कंटाळून त्या पिडीत मुलीने ताबडतोब गावी पोहोचवण्याची व्यवस्था न केल्यास स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करणार असल्याचे त्या मुलीने सांगीतल्याने त्याने त्या मुलीला बार्शीतील तिच्या घराजवळ सोडले व पळ काढला. तोपर्यंत बार्शी पोलिसांत सदरची मुलगी हरवल्याची तक्रार बार्शी पोलिसांत दाखल झाली होती. पोलिसांना आपल्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती देऊन सदरचा प्रकार लपविला गेला होता परंतु पुन्हा थोड्याच दिवसांत त्या नराधमने तिच्या घराजवळ घिरट्या घालून वाईट हेतूने तिला हातवारे करुन पुन्हा तिला दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून त्या पिडीत मुलीने आपल्यावर वाईट प्रसंग ओढावला होता अशी कुटूंबियांकडे कबुली दिली. तिच्या कुटूंबियांनी सर्व हकीकत पोलिसांसमोर कथन केल्याने आरोपी सूरज शेटे याच्या विरुध्द बार्शी पोलिसांत ३६३, ३६६(अ), ३५४ (अ), नुसार गुन्हा नोंद झाला आहे. सदरच्या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉं. सुनिल बनसोडे हे करीत आहेत.
 
Top