बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शेतीसाठी जाणार्या रस्त्याच्या प्रश्नाकरिता वालवड (ता. बार्शी) येथील बाबाशा भालेराव वय ७५ यांच्या एकाच कुटूंबातील ७ जणांनी जागतिक अहिंसा दिनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत भालेराव यांना माहिती विचारली तेव्हा ते म्हणाले, माजी सरपंच व तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड्. सुभाष शंकरराव जाधवर यांनी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या कारणाने गावातील लोकांसोबत आम्ही उपोषणास बसलो होतो त्याचा राग मनात धरुन आमच्या शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता स.नं. बंध व शिवबांध हे जे.सी.बी.च्या सहाय्याने खोदाई करुन रस्त्यास अडथळे निर्माण केले. तत्कालिन तहसिलदार दशरथ काळे यांनी स्थळ पंचनाङ्का पूर्णपणे खोटा करुन संगणताने चुकीचा निकाल दिला. त्याचा इन कॅमेरा फेर पंचनामा करण्यात यावा. नंबरी बांध व शिवबांध यांच्या हद्दी खुना कायम करुन आमच्या शेतात जाणारा रस्ता पूर्ववर करावा. शेतात जाता येता सुभाष जाधवर व त्यांच्या कुटूंबियांकडून आम्हास नाहक त्रास तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन आम्हाला त्रास देत आहेत त्याबद्दल न्याय मिळावा, तंटामुक्त गाव कार्यक्रम यशस्वी होतांना सुभाष जाधवर हे कायद्याचे ज्ञान वापरुन हस्तकांमार्फत नोटीसा देणे व तक्रारी अर्ज करुन गावात अशांतता पसरवणे, गोरगरिबांना धमकावणे कायद्याचा धाक दाखवणे असे प्रकार वारंवार करत असल्याने मी कुटूंबासमवेत आमरण उपोषणास बसलो असल्याचे बाबाशा भालेराव व त्याच्या परिवारातील सदस्यांनी सांगीतले.