कळंब (बालाजी जाधव) -: कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना जमा भागावर बारा टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी संस्थेच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार रोजी शिक्षक भवन कळंब येथे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत लेखा परीक्षण दोष दुरुस्ती, तेरीज पत्रक, नफा-तोटा पत्रक ताळेबंद पत्रक व अंदाज पत्रकास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. तसेच 97 व्या घटना दुरुस्तीनुसार नवीन नियम लागू झाले असून त्या नियमानुसार यापुढे संस्थेचा कारभार संचालक मंडळास करणे गरजेचे आहे, असे बाळकृष्ण यांनी सांगितले. तातडी कर्ज मर्यादा वाढवणे, संस्थेच्या 21 लाख रुपये झालेल्या नफ्यातून सभासदांना बारा टक्के लाभांश वाटप करणे या घोषणा बाळकृष्ण तांबारे यांनी केल्या. या घोषणेचे सभासदांनी स्वागत केले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समितीचे नेते कल्याण बेताळे, शिक्षक संघाचे नेते एल.बी. पडवळ, परंडा संस्थेचे सचिव बाळासाहेब पुजारी हे उपस्थित होते. याप्रसंगी बेताळे बोलताना म्हणाले, कळंब तालुका शिक्षक संस्था ही मराठवाडयातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगली पारदर्शी व काटकसरीने काम करणारी संस्था म्हणून नावलौकीक मिळवला आहे. या संस्थेचा आदर्श जिल्ह्यातील इतर संस्थेनही घेणे गरजेचे आहे.
यावेळी बाळासाहेब पुजारी यांचा परंडा संस्थेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब घुटे, विलास कदम, पिराजी गोरे, सुधीर अडसुळ, विठ्ठल माने, भक्तराज दिवाने, दत्तात्रय पवार, राजाभाऊ रितापुरे, नागेश टोणगे, राजेंद्र बिक्कड, भास्कर चव्हाण, प्रविण मांडवकर, शिवराज बाकले यांनी चर्चेत सहभाग घेऊन संचालक मंडळाच्य कार्याचे कौतुक केले.
या सर्वसाधारण सभेस उपाध्यक्ष प्रसाद मुंढे, संचालक अमोल बाभळे, डि.ओ. पवार, दिनेश अडसूळ, धर्मराज मडके, नेताजी वाघ, सतिश एडके, बाळासाहेब गिराम, दत्तात्रय सुरेवाड, श्रीमती मंजुषा घोळवे, मनिषा ताकपिरे या संचालक मंडळासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. संस्थेचे अहवाल वाचन सचिव संतोष ठोंबरे यांनी केले तर आभार डि.ओ. पवार यांनी मानले.