इटकळ -: रागाच्या भरात एका युवकाने आरळी बु. (ता. तुळजापूर) येथे गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीसह सासू, सासरा या तिघांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग अनिल व्हरकट (वय 25, रा. आरळी बु,, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पत्नी मनीषा पांडुरंग व्हरकट, सासू भागाबाई धनाजी तांबे, सासरा धनाजी बाबुराव तांबे असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. यातील पांडुरंग याने दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी गावाबाहेर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मयताचे वडील अनिल व्हरकट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पांडुरंगची पत्नी, सासू व सासरा हे तिघे गेल्या एक वर्षापासून तुला तुरुंगात पाठवेन म्हणून त्याच्याबरोबर नेहमी भांडणे करीत असत. त्यांनी अनेक वेळेस त्याच्या पत्नीला माहेरी घेऊन गेले होते. आम्ही अनेक वेळेस भांडण मिटवून मुलीला सासरी घेऊन आलो होतो. परंतु दि. 18 ऑक्टोबर रोजी इटकळ पोलिसात खोटी मारहाणीची तक्रार दिली होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पांडुरंगने आत्महत्या केली. याप्रकरणी वरील तिघांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार गोविंद पवार हे करीत आहेत.