उस्मानाबाद :- रब्बी हंगाम 2013-14 दि. 15 आक्टोबरपासून सुरु होत असून जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, साठवण तलाव,अधिसूचित नदी-नाले यावर प्रवाहाने उपसा सिंचनाने गहु, ज्वारी, हरबरा, सुर्यफुल व इतर पिकाचे क्षेत्र भिजविणाऱ्या बागायतदारांना उपसा सिंचनाचे पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी पाणी अर्ज नमुना 7 भरुन संबंधित शाखा कार्यालयात आपले पाणी अर्ज 15 ऑक्टोबरपर्यत दाखल करावेत, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग,उस्मानाबाद यांनी केले आहे.
          पाणी पुरवठयाचा दिनांक 15 ऑक्टोबर,2013 ते 28 फेब्रुवारी 2014 या कालावधीत पाणी पीकासाठी पुरविले जाईल. बागायतदार शेतक-यांनी सर्व सूचनांचे पालन करावे. सूचनांसाठी वरील कार्यालयाशी संपर्क साधावा.                         
 
Top