उस्मानाबाद - परंडा वगळता जिल्ह्यातील 7 तालुक्यातील खरीप पीकाची नजर अंदाज पैसेवारीवरुन जिल्ह्याची खरीप पिकाची हंगामी नजर अंदाजे पैसेवारी 66 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. परंडा तालुका हा संपूर्ण रब्बी पेरणी गावाचा असल्याने आणि या तालुक्यातील खरीप पेरणी क्षेत्र दोन तृतीयांशपेक्षा कमी असल्यामुळे तेथील खरीप हंगामाची पैसेवारी निर्धारित करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात एकूण 737 महसूली गावे असून त्यापैकी खरीप पेरणी पिकाखालील 362 गावे आणि रब्बी पेरणी पिकाखालील 375 गावे आहेत. शासन आदेशानुसार पैसेवारी समितीने प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उच्च, मध्यम, कनिष्ठ अशा तीन प्रतवारीच्या जमिनीमध्ये पीक परिस्थिती पिकाची पाहणी केल्यानुसार खऱीप पिकाची हंगामी पैसेवारी दि. 30 सप्टेंबर रोजी जाहीर केली . रब्बी पेरणी 375 गावांपैकी कळंब तालुक्यातील 19 आणि वाशी तालुक्यातील 23 अशा 42 रब्बी पेरणी गावांचा पीक पेरा दोन तृतीयांश पेक्षा जास्त झाल्यामुळे या गावांसह खरीप पेरणीची 362 गावे अशी एकूण 404 गावांची पैसेवारी खरीप हंगामात जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.