बार्शी : नवरात्र पौर्णिमेस पायी तुळजापूरला जाऊन बसने आलेल्या भाविकांना घरापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहनांची सोय करुन आनंदयात्री प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रम राबविला आहे.
    रात्रभर बसची सुविधा उपलब्ध केल्याने रात्री अपरात्री पायी चालत थकून आलेल्या भाविकांना घरापर्यंत जाण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध नसते, अँटो रिक्षा चालकांकडून लूट केली जाते, त्यावर लक्ष केंद्रीत करुन सामजिक भान ठेवत चांगला उपक्रम राबविल्याबाबत आनंदयात्री प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे.
    नागेश अक्कलकोटे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमित निकम, रुपेश बंगाळे, विवेक गजशिव, कृष्णा उपळकर, रामचंद्र इकारे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top