पांगरी : बस व टेम्‍पो यांच्‍या अपघातात भाविक प्रवाशी जखमी झाले होते. याप्रकरणी एसटी बस चालकाविरूद्ध शनिवार रोजी पांगरी पोलिसात गुन्‍हा करुन अटक करण्‍यात आली आहे.
        सुशांत जगदाळे (एसटी चालक, रा.इर्ले, ता.बार्शी) असे गुन्‍हा दाखल करुन अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तुळजापुर येथुन देवीदर्शनाचा कार्यक्रम आटोपुन उंबर्गे (ता.बार्शी) गावाकडे भाविकांना घेऊन चाललेला टेम्पो क्र.एम. एच. 13 एएन. 1579 चिखर्डे शिवारात थांबलेला असताना तुळजापुर येथुनच प्रवार्शी घेऊन बार्शीकडे निघालेल्या एम.एच. 20 बिएल 0039 या बसने सदर टेम्पोला पाठीमागुन भरधाव वेगात जोरदार धडक दिली होती. त्यामुळे किरण विनायक शिकरे, दत्तात्रय ज्ञानदेव हावळे, अल्‍लाउदीन जिलानी शेख यांच्यासह टेम्पोतील इतर सहा व एस टी बसमधील विजय वसंतराव जोशी भगवान दशरथ सुरवसे व अन्‍य चारजण जखमी झाले होते.
    अपघातात टेम्पोचे एक लाख व एसटीचे पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आरोपीने आपल्या ताब्यातील एस टी बस हयगयीने, अविचाराने परिस्थतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवुन रोडच्या बाजुस उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगात धडक देऊन टेम्पो व बसमधील प्रवाशांच्या जखमी होण्‍यास व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभुत ठरल्याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. रविंद्र भडुरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
 
Top